महोत्सव व्यवस्था

पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष आहे. या पहिल्या महोत्सवाचे स्वरूप खालीलप्रमाणे असणार आहे. 

श्रोत्यांसाठी व्यवस्था

 

श्रोत्यांसाठी निःशुल्क निवास व्यवस्था :

निवास व्यवस्थेची माहिती, अटी आणि नियम 

१) निवासव्यवस्था होस्टेलमधील खोल्यांमध्ये आहे. खोल्यांमध्ये एसी नाहीत. पंखे आहेत. अटॅच्ड टॉयलेट बाथरूम नसून बाहेरच्या बाजूला टॉयलेट बाथरूम व्यवस्था आहे. एकूण २५ टॉयलेट आणि २५ बाथरूम आहेत. खोल्यांमधून बंक बेड ची सुविधा आहे. प्रत्येक खोलीत साधारण १० बेड आहे. तसेच अन्य गाद्यांची व्यवस्था असून एका खोलीत १५ व्यक्ती राहू शकतात. 

२) स्त्री-पुरुषांची निवासाची स्वतंत्र व्यवस्था आहे. 

३) निवास व्यवस्था घेतलेल्या सर्व रसिकांना संगीत महोत्सवामध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 

४) ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांनाच निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. ऐनवेळी तिथे येऊन निवास करता येणार नाही. 

५) फक्त निवास व्यवस्था उपलब्ध आहे. चहा, नाश्ता, भोजन इ. व्यवस्था परिसरामध्ये सःशुल्क उपलब्ध आहे. 

६) आयोजकांचा निर्णय अंतिम राहील. सर्वप्रकारचे सहकार्य करावे लागेल हे लक्षात घ्यावे. 

७) कृपया खालील फॉर्म वर क्लिक करून आपली माहिती कळवावी. 

८) निवास व्यवस्था कन्फर्मेशन २ मे २०२२ पर्यंत कळविण्यात येईल

कलाकारांसाठी व्यवस्था

 

 १) ७ आणि ८ मे, २०२२ रोजी शनिवार - रविवार आहे. दोन दिवस हा महोत्सव होणार आहे.

२) येथे आपली कला सेवा सादर करणारे कलाकार हे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या विषयी निर्मळ प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञतेच्या भावनेने येथे आपली कला सादर करणार आहेत. कुरुंदवाड येथे जाण्या-येण्याचा खर्च त्यांना स्वतःचा स्वतःला  करायचा आहे. तसेच त्यांना त्यांच्या सादरीकरणासाठी बिदागी किंवा मानधन मिळणार नाही.

३) सर्व कलाकारांची ६ तारखेला संध्याकाळपासून ते ८ तारखेला रात्रीपर्यंत निवास, शाकाहारी भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे.
 

४)  पहिल्या वर्षी अधिकाधिक कलाकारांनी येथे हजेरी लावणे अपेक्षित आहे. प्रत्येक कलाकाराला त्याची कला सादर करण्यासाठी सुमारे ४५ मिनिटांचा कालावधी उपलब्ध आहे. सुमारे १६ ते २० कलाकारांनी आपली कला सादर करावी असे नियोजन आहे. परिसरातील स्थानिक कलाकारांच्या सादरीकरणासाठी काही कालावधी राखून ठेवला आहे.   

 

५) महोत्सवाचे वेळापत्रक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर " कार्यक्रम " या पानावर दिले आहे.  
 

६) निवास व्यवस्था :  नृसिंहवाडी येथे हॉटेलमध्ये दोन किंवा तीन जणांसाठी एकत्रित अशी व्यवस्था आहे. शाकाहारी भोजन तसेच अल्पोपहार चहा-कॉफी अशी व्यवस्था आहे. निवासाच्या ठिकाणापासून कार्यक्रमस्थळी जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था नि:शुल्क उपलब्ध केली आहे.

१) या संगीत महोत्सवाला श्रोत्यांना नि:शुल्क प्रवेश उपलब्ध असून सुमारे ५०० हून अधिक श्रोते खुर्च्यांवर बसू शकतील अशी व्यवस्था आहे. भारतीय बैठकीची देखील व्यवस्था आहे.


२) नृसिंहवाडी येथे निवासासाठी मोठ्या प्रमाणावर लॉज, धर्मशाळा आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. नृसिंहवाडी ते कुरूंदवाड - महोत्सव स्थळ हे अंतर फक्त दीड ते दोन किमी एवढे आहे. 


३) जयसिंगपूर ( १५ किमी), इचलकरंजी ( १६ किमी), मिरज  ( १८ किमी), सांगली  ( २४ किमी),  कोल्हापूर  (५० किमी) येथे मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स आणि निवास व्यवस्था उपलब्ध आहे. त्यांची माहिती, फोन नंबर, वेबसाईट इ. "उपयुक्त माहिती" या सदरामध्ये दिली आहे. तसेच  कार्यक्रमस्थळी अल्पोपहार, भोजन, चहापान इ. साठी स:शुल्क सेवा उपलब्ध केली जाणार आहे.


४) कुरुंदवाड परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती "उपयुक्त माहिती"मध्ये दिलेली आहे. त्यानुसार श्रोत्यांना महोत्सवाबरोबरच स्थानिक पर्यटनासाठी नियोजन करता येईल.