उद्दिष्टे

Marble Surface

१) पं. विष्णु दिगंबर पलुस्करांचे भारतीय संगीत क्षेत्रातील कार्य अत्यंत महान आहे. त्यांच्या नावाविषयी संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर आत्यंतिक आदर, जिव्हाळा आणि प्रेम भरलेले आहे. त्यांचा संगीतातील अधिकार, त्यांचे राष्ट्रप्रेम, त्यांची उपक्रमशीलता, साहस आणि संगीत साक्षरता तळागाळात पोहोचावी यासाठी असलेली तळमळ याविषयी सर्वांना अपार आदर आहे. त्यांची जन्मभूमी कुरुंदवाड याठिकाणी येऊन संगीतसेवा देण्याची अनेक मान्यवर कलाकारांची आंतरिक ईच्छा आहे. त्याचप्रमाणे जर कुरुंदवाड येथे सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर जर ४-५ दिवसीय संगीत महोत्सव आयोजित केला तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विदेशातून किमान २५,००० रसिक  तेथे नक्की पोहोचतील अशी खात्री पं. विकास कशाळकर यांनी व्यक्त केली आहे. डिसेंबर २१ किंवा जानेवारी २२ या दरम्यान दोन दिवसीय महोत्सव सुरुवातीला आयोजित करावा. डिसेंबर २२ किंवा जानेवारी २३ मध्ये त्याचा विस्तार करावा. डिसेंबर २३ किंवा जानेवारी २४ मध्ये त्याचा अधिक विस्तार करावा आणि डिसेंबर २४ किंवा जानेवारी २५ मध्ये तो सवाई गंधर्व महोत्सवाच्या तोडीस तोड असा आयोजित करावा अशी संकल्पना आहे.

२) याचबरोबर कुरुंदवाड शहरामध्ये पं. विष्णू दिगंबर पलुस्करांचे स्मारक उभे करणे, पुतळा उभा करणे, कमान उभी करणे, एखाद्या रस्त्याला त्यांचे नाव देणे असे उपक्रम भविष्यात करण्याची योजना आहे.
 

३) कुरुंदवाड नृसिंहवाडी परिसरामध्ये पं. विष्णु दिगंबर पलुस्कर, भुगंधर्व रहीमत खान आणि विष्णुपंत छत्रे, मिरज येथे अब्दुल करीम खान आणि इचलकरंजी येथे बाळशास्त्रीबुवा इचलकरंजीकर, पंडित डी.वी. काणे बुवा अशी संगीतातील मात्तबर  घराणी एकवटली आहेत. तसेच कोल्हापूर येथील अल्लादीया खान यांनीही जयपूर घराण्याची मुहुर्तमेढ रोवली आहे. त्यामुळे कुरुंदवाड येथे विष्णु दिगंबर पलुसकर संगीत महोत्सव आयोजित केल्यास या सर्व घराण्यांना आपल्याला जोडता येईल.
 

४) पं. विष्णु दिगंबर पलुसकर संगीत विद्यापीठ आणि संशोधन संस्था स्थापन करणे.
 
५) संगीतोपचार रिसॉर्ट सुरू करणे.

 

६) संगीत पर्यटन उपक्रम सुरू करणे.
 

७) मुझियम उभे करणे.
 

८) पुस्तक प्रकाशन करणे.
 

९) युट्यूब चॅनेल सुरू करणे.


१०) कुरूंदवाडला देशाची Music City of India बनवणे.